रंग माझा वेगळा


                   रंग माझा वेगळा

             स्वत : च्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात सर्व रंगात रंगले , तरी माझा रंग वेगळा व अनोखा आहे . माझे व्यक्तिमत्त्व साऱ्यांहून वेगळे आहे . कुठल्याही गुंत्यात मी अडकलो , तरी त्या बंधनातून मी मुक्त होतो .मला कलले नाही कुठून आणि कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या ; पण मी असा संवेदनशील आहे की , या मुखछायेच्याही माझ्या मनाला झळा लागतात . सुखातही मला मानसिक वेदना होतात . माझ्या डोळ्यांतले दुःखाश्रू गाण्याप्रमाणे माझ्यासोबत सदैव राहतात , अश्रूच माझे गाणे होते . हे असे कशाचे दुःख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला . दुःखावरही मी माया करतो , कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले , जाणीव झाली हे मला कळले नाही . पण मी आयुष्य जगायला लागलो . तथापि , माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला . माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली . चारीबाजूंनी या दिशा , ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात नि माझी दिशाभूल करतात . कारण जो नीट चालतो , त्याला जग पांगळा म्हणते नि जो नीट पाहतो , त्याला जग आंधळा म्हणते . ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे . जिथे जिथे अंधार आहे , दारिद्र्याचा काळोख आहे , अशा नैराश्येच्या काळ्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे . माझ्या विचारांना दिव्य तेज आहे , इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे . मी स्वत : साठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही . स्वार्थाचा उत्सव मी साजरा करीत नाही .


       While describing his own calendar attitude, the poet says that although I am painted in all colors, my color is different and unique.  My personality is different from all others.  I am free from any bondage .I do not know where and how the shadows of happiness came to me;  But I am so sensitive that even this mask touches my mind.  Happiness also causes me mental pain.  The tears in my eyes stay with me forever like a song, tears are my song.  I was so sad that I had to fight this pain too.  I love even in sorrow, I don't know when I realized life.  But I started living life.  However, this life betrayed my honest life.  The price of my faith was betrayed by the world.  All around, these people tell me the essence of life and mislead me.  Because the world calls the one who walks well lame, and the one who sees well, the world calls blind.  Hypocrites have deceived the pure life.  Wherever there is darkness, there is the darkness of poverty, in the black midnight of such despair I am the sun shining everywhere.  My thoughts have divine radiance, my attitude is to rise up against injustice done to others.  I never burn for myself or my selfishness.  I do not celebrate selfishness.


Comments

Popular posts from this blog

व्यक्तीच्या जीवनातील ' आत्मविश्वासा' चे स्थान

Babasaheb Ambedkar

Confidence