व्यक्तीच्या जीवनातील ' आत्मविश्वासा' चे स्थान


व्यक्तीच्या जीवनातील ' आत्मविश्वासा' चे स्थान 
              . आत्त्मविशवास म्हणजे स्वत : चा स्वत : वरील विश्वास . व्यक्तीच्या जीवनात या आत्मविश्वासाला खूप महत्त्व असते . आपल्या क्षमतांची ओळख पटली की आपण कोणकोणती कामे करू शकतो , ते कळते . मग आपण आपल्याला जमणारी कामे निवडतो . आपल्याला काम करताना त्रास होत नाही . त्याचे कष्ट जाणवत नाहीत . उलट , ते काम करताना आपल्याला आनंद मिलतो . अशी आवडीची कामे करीत जगणे म्हणजे आनंदी जीवन होय . आपले जीवन आनंददायक व्हायचे असेल , तर आपल्याला आवडती कामे करायला मिळाली पाहिजेत . त्यासाठी आपली क्षमता आपल्याला कळली पाहिजे . तशी ती कळली , तर आपल्याला आत्मविश्वास येईल , म्हणजेच , आनंदी , सुखी जीवनासाठी आत्मविश्वासाची गरज असते . आत्मविश्वासामुळे आपण कितीही कामे करू शकतो . कितीही कठीण कामे करू शकतो . खूप कामे करणे दीर्घोदयोग . दीर्घोदयोगामुळे आपल्या हातून खूप कामे होतात . विशिष्ट क्षेत्रात आपली कीर्ती पसरते . म्हणजेच आपण पराक्रमी बनतो . आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे . खूप कामे करण्यामुळे कामे अचूक कशी करावीत , भरभर कशी करावीत , हे कौशल्य आपला मेंदू वाढवीत नेतो , हीच बुद्धिमत्ता होय . थोडक्यात , आत्मविश्वासामुळे माणूस पराक्रमी व बुद्धिमान होतो , हे बाबासाहेबांचे म्हणणे अक्षरश : खरे आहे .


The place of 'confidence' in a person's life. 
Self-confidence is self-confidence.  This confidence is very important in a person's life.  Once your abilities are recognized, you know what you can do.  Then we choose the tasks that suit us.  You don't have trouble working.  Don't feel his pain.  On the contrary, we enjoy doing it.  Living a life of pleasure is a life of joy.  If you want your life to be enjoyable, you must do what you love.  You need JavaScript enabled to view it.  Knowing that will give you confidence, which means you need confidence to live a happy, happy life.  We can do as many things as we want with confidence.  Can do any hard work.  It takes a long time to do a lot of work.  Prolonged use makes you do a lot of work.  Your fame spreads in a specific area.  That is, we become mighty.  One more thing to keep in mind.  The skill of doing a lot of work, how to do the work accurately, how to do it well, increases your brain, this is the intelligence.  In short, Babasaheb's statement that self-confidence makes a person strong and intelligent is literally true.

Comments

Popular posts from this blog

Babasaheb Ambedkar

Confidence